पानाच्या पिचकाऱ्यांनी भिंती लाल भडक,तंबाखूच्या पुड्या, कचरा..सरकारी इमारत आहे की खंडर?
अप्पासाहेब शेळके
Updated at:
09 Jan 2025 12:24 PM (IST)
1
धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील सरकारी सेंट्रल बिल्डिंग अक्षरशः खंडहर झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेली ही दोन मजली इमारत आता अत्यंत खराब स्थितीत आहे.
3
शासकीय इमारतीबाहेर पचपच थुंकल्याने सगळ्या भिंती रंगल्या आहेत. परिसरात तंबाखूच्या पुड्या, गुटख्याची पाकिटं, प्रचंड कचरा दिसतोय.
4
भिंतींवर पानांच्या पिचकाऱ्यांचे डाग असून, इमारतीचा संपूर्ण परिसर दुर्लक्षित झाला आहे.
5
कार्यालयांच्या बाहेर गवत उगवले असून, इमारतीच्या भिंतींवर झाडेही उगवलेली दिसत आहेत.
6
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सात कलमी कार्यक्रमानुसार स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे, परंतु या इमारतीची दुरवस्था पाहून तो कितपत अंमलात आणला जातोय, यावर प्रश्नचिन्ह आहे.