Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे चाणक्य, शरद पवारांचा करिष्मा फेल!
या निवडणुकीत भाजप आणि महायुतीच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडी अक्षरश: भुईसपाट झाल्याचे चित्र दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत होईल, अशी चर्चा होती. मात्र, ही अपेक्षा सपशेल फोल ठरली आहे.
यंदाच्या निवडणुकीत शरद पवार यांनी महायुती आणि विशेषत: भाजपच्याविरोधात केलेला प्रचार हा, चर्चेचा विषय ठरला होता.
शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभरात 69 सभा घेतल्या होत्या. त्यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील सभांना मोठी गर्दी पाहायला मिळाली होती.
विधानसभेच्या प्रचारात शरद पवार यांनी भाजपचा 'बटेंगे तो कटेंगे' हा अजेंडा खोडून काढला होता. याशिवाय, लाडक्या बहीणमुळे महायुतीला मिळणारी सहानुभूतीही शरद पवार यांनी महिला अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करत कमी करण्याचा प्रयत्न करत होता.
मात्र, प्रत्यक्ष निकाल पाहता शरद पवार यांची रणनीती आणि करिष्मा पूर्णपणे फेल गेल्याचे दिसत आहे.
शरद पवार कोणत्याही क्षणी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देऊ शकतात किंवा ते राजकीय वाऱ्याची दिशा बदलू शकतात, अशाप्रकारची सामर्थ्यशाली प्रतिमा जनमानसात होती.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीची स्थापना केली होती. हा देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाला मोठा शह ठरला होता.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी भाजप आणि महायुतीचे मनसुबे उधळून लावतील, असे दावे केले जात होते.