Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lok Sabha Election : 18 व्या लोकसभेत 504 खासदार कोट्यधीश, सर्वात श्रीमंत खासदार कोणत्या पक्षाचा? जाणून घ्या
लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जूनला जाहीर झाले आहेत. देशातील 543 खासदारांपैकी 93 टक्के खासदार कोट्यधीश आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2019 आणि 2014 च्या तुलनेत कोट्यधीश खासदारांची संसदेतील संख्या वाढली आहे. 2019 कोट्यधीश खासदारांची संख्या 88 तर 2014 ला 82 टक्के होती.
18 व्या लोकसभेतील सर्वात श्रीमंत खासदार हजारो कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. 18 व्या लोकसभेतील सर्वाधिक श्रीमंत खासदारांच्या यादीतील पहिले तीन खासदार हे एनडीएचे आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्संन श्रीमंत खासदारांची यादी जाहीर केली आहे.
एडीआरच्या रिपोर्टनुसार आंध्र प्रदेशच्या गुंटूरमधील टीडीपीचे खासदार चंद्रशेखर पेम्मासानी सर्वाधिक श्रीमंत खासदार आहेत. त्यांची संपत्ती 5705 कोटी रुपये आहे.
भाजपचे तेलंगणाच्या चेवेल्ला लोकसभा मतदारसंघातील कोंडा विश्वेश्वर रेड्डी हे दुसऱ्या स्थानी आहेत. ते 4568 कोटींचे मालक आहेत.
हरियाणातील कुरुक्षेत्रचे भाजपचे खासदार नवीन जिंदाल तिसरे सर्वाधिक श्रीमंत खासदार आहेत. ते 1241 कोटींचे मालक आहेत.