Rishabh Pant : महेंद्रसिंह धोनीचा सल्ला ते संजू सॅमसन सोबतची मैत्री, 17 नंबरची जर्सी का निवडली? रिषभ पंत म्हणतो...
टीम इंडियाचा विकेटकीपर रिषभ पंतनं त्यानं पहिल्या चेकच्या पैशातून बॅट खरेदी केली होती, असं सांगितलं. अधिक दबाव ज्यावेळी येतो त्यावेळी मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करतो, असं रिषभ पंतनं म्हटलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअपघातानंतर जीवनाकडे आणि क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा बदलला असा प्रश्न विचारला असता रिषभ पंतनं अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचं म्हटलं. मानसिक दृष्ट्या स्वस्थ आहे. सकारात्मक विचार करतोय, असं तो म्हणाला. दुखापतग्रस्त असताना स्वत:सोबत बोलायला लागायचं, त्यामुळं सकारात्मक विचार करायचो, असं रिषभ पंत म्हणाला.
जर्सीचा क्रमांक 17 का आहे याबद्दल विचारलं असता रिषभ पंतनं लहान असतो त्यावेळी सतरा वर खतरा म्हणतो. इतर क्रमांक दुसऱ्यांनी घेतले होते. मला 7 क्रमांक हवा होता. त्यामुळं सतरा क्रमांक घेतला होता, असं रिषभ पंतनं म्हटलं.
महेंद्रसिंह धोनी सर्वांना प्रोसेसवर लक्ष देण्यास सांगतो.हे जेवढं बोलायला सोपं वाटतं तितकं करण्यास अवघड असतं, असं रिषभ पंत म्हणाला. भावनिक दृष्ट्या चढ उतार येत असतात त्यावेळी तुम्ही सकारात्मक विचार करुन ती गोष्ट सोडून पुढं जावा, असं रिषभ पंत म्हणाला.
आयपीएलमध्ये मित्रांविरोधात खेळताना मजा येते. तुम्ही क्रिकेटचा आनंद घेणं महत्त्वाचं असतं असं रिषभ पंतनं म्हटलं.
रिषू भैय्या शादी कब कर रहे हो? असा प्रश्न चाहत्यानं विचारला असता रिषभ पंतनं जेव्हा वेळ येईल तेव्हा उत्तर देईन असं म्हटलं. माझी पहिली प्राथमिकता क्रिकेट खेळणं ही असून बाकी सर्व गोष्टी दुय्यम आहेत, असं रिषभ पंत म्हणाला. चाहते प्रेम करतात या गोष्टी चांगल्या वाटतात, असं रिषभनं म्हटलं.
महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2025 मध्ये खेळेल की नाही याबाबत विचारलं असता रिषभ पंतनं या गोष्टीचं उत्तर माहीभाईच देऊ शकतात. काही उत्तरं माहीभाईकडून मिळू शकतात, असं रिषभ पंत म्हणाला.
संजू सॅमसन सोबत चांगली मैत्री आहे. सोशल मीडियावर चर्चा होत असतात पण आम्ही या गोष्टींकडे लक्ष देत नाही. आम्ही संघातील सहकारी आहोत, असं रिषभ पंत म्हणाला.