The Daily Guardian Survey: शिवसेना खासदाराच्या मतदार संघात सर्वेक्षण, जनता म्हणतेय, मोदींच्या नावावर देणार मतं; निष्कर्ष काय?
डेली गार्डियनच्या सर्वेक्षणात मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करण्यात आलं. यासोबतच त्यांच्याबाबत लोकांची मतंही जाणून घेण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल शेवाळे हे शिवसेना पक्षाचे खासदार आहेत, त्यांनी 2010 ते 2014 पर्यंत चार वेळा मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राहुल शेवाळे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.
2014 पासून त्यांना मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून सलग दोन वेळा संसदेत जाण्याची संधी मिळाली. सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आलं की, तुम्ही उमेदवाराच्या नावावर मतदान करणार का? यावर 76 टक्के लोकांनी होकार दिला. तसेच, 20 टक्के लोकांनी मतदान करणार नसल्याचं सांगितलं. याशिवाय 4 टक्के लोकांनी माहीत नाही हा पर्याय निवडला.
शिवसेना खासदाराच्या मतदारसंघावर मोदी फॅक्टरचा कितपत परिणाम होईल? या प्रश्नाच्या उत्तरात 71 टक्के लोकांनी होय, मोदी फॅक्टरचा परिणाम होईल, असं उत्तर दिलं. 20 टक्के लोकांनी सांगितलं की, मोदी फॅक्टरचा त्यांच्या क्षेत्रावर परिणाम होणार नाही. तसेच, 9 टक्के लोकांनी माहिती नाही हा पर्याय निवडला.
तुमच्या खासदाराच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? या प्रश्नाच्या उत्तरात 65 टक्के लोकांनी त्यांच्या कामावर समाधानी असल्याचं सांगितलं. 30 टक्के लोकांनी ते समाधानी नसल्याचं सांगितलं. याशिवाय 5 टक्के लोकांनी माहिती नाही हा पर्याय निवडला.
2024 च्या निवडणुकीत विद्यमान खासदाराला मतदान करणार? या प्रश्नाला उत्तर देताना 69 टक्के लोकांनी शिवसेना खासदाराच्या बाजूनं कौल दिला. 20 टक्के लोकांनी आपण विद्यमान खासदाराला मतदान करणार नसल्याचं सांगितलं. तसेच, या प्रश्नाच्या उत्तरात 11 टक्के लोकांनी माहिती नाही हा पर्याय निवडला.
राहुल शेवाळे यांनी संसदेच्या 92 टक्के कामकाजात सहभाग घेतला. संसदेत खासदारांची उपस्थिती 93 टक्के आहे. एकूणच राहुल शेवाळे यांना 10 पैकी 8.1 रेटिंग मिळालं आहे.