BJP Menifesto : लाडकी बहिण योजना, महिला सुरक्षा ते लखपती दीदी; भाजपच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी काय काय?
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपच्या जाहीरनाम्यामध्ये महिलांसाठी काही विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.
लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला रु. 1500 वरुन रु. 2100 देण्यात येतील तसेच या योजनेचे औचित्य साधून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल.
महिला सुरक्षेसाठी 25000 महिलांचा पोलिस दलात समावेश करण्यात येईल.
अंगणवाडी आणि आशा सेविकांची आर्थिक सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महिन्याला रु15000 वेतन आणि विमा संरक्षण देण्यात येईल.
सन 2027 पर्यंत महाराष्ट्रात 50 लक्ष लखपती दीदी तयार करण्यात येतील.
यासाठी, प्रत्येक500 स्वयंसहायता गटांचे एक औद्योगिक क्लस्टर तयार करण्यात येईल आणि 21000 कोटींचा प्रारंभिक फिरता निधी उपलब्ध करण्यात येईल.