भारतात लढाऊ विमानं चालवणाऱ्या पायलटला नेमका पगार किती मिळतो? पहिलाच पगार लाखांपासून सुरु
विविध देशांच्या वायू दलांच्या विमानांची प्रात्याक्षिकं आपल्याला पाहायला मिळतात. विविध देशांकडे लढाऊ विमानं असतात. त्या लढाऊ विमानांचे पायलट होण्याचं अधिक स्वप्न असतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलढाऊ विमानं चालवणाऱ्या वैमानिकांना किती पगार मिळतो? याची अनेकांना उत्सुकता असते. भारतीय हवाई दलात पायलटची रँक त्याचा अनुभव आणि पात्रतेवर अवलंबून असते. रँक जशी वाढते त्यासह पगार पण वाढत जातो. जेवढा अनुभव जास्त पगार जास्त मिळतो.
काही पायटलना त्यांच्याकडील कौशल्यासाठी अतिरिक्त भत्ता देखील मिळतो. याशिवाय पायलटना इतर भत्ते देखील मिळत असतात.
भारतीय हवाई दलात नव्यानं रुजू होणाऱ्या नवख्या पायलटच्या वेतनाचा विचार केला असता त्यांना सुरुवातीला 1.5 लाख रुपये दरमहा वेतन मिळत असतं.
लढाऊ विमानं चालवणाऱ्या पायलटचा अनुभव जसा जसा वाढत जातो तसा त्यांचा पगार देखील वाढत जातो. अनुभव लढाऊ जेट पायलटला दरमहा 5 ते 6 लाख रुपयांपर्यंत दरमहा पगार मिळतो. लढाऊ विमानांच्या पायलटला मोफत वैद्यकीय सुविधा, फेलोशिप, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन देखील मिळते.