OTT चे सुपरहिट क्राईम थ्रिलर चित्रपट; एकदा पाहाल तर नक्कीच झोप उडेल, स्वतःच्या रिस्कवर पाहा!
इंडस्ट्रीत असे काही चित्रपट बनले आहेत, जे प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. असं कसं घडू शकतं, याचं सर्वांना आश्चर्य वाटतं, परंतु, चित्रपटासाठी सर्वकाही शक्य आहे. तुम्ही फक्त OTT वर या चित्रपटांचा आनंद घ्या आणि रिलॅक्स व्हा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'गँग्स ऑफ वासेपूर' हा चित्रपट आहे, ज्यानं अनेक कलाकारांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये ओळख दिली. त्याचे दोन भाग एकाच वर्षी रिलीज झाले होते आणि ते दोन्ही भाग जिओ सिनेमावर दिसणार आहेत.
'बदला' चित्रपटात एक कथा आहे, ज्यात अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू मर्डर मिस्ट्री उकलण्याचं काम करतात. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
'ब्लर' हा तापसी पन्नूचा सस्पेन्स-क्राईम आणि थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट तुम्ही Zee5 वर पाहू शकता. यामध्ये असे अनेक ट्विस्ट आहेत, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
'चुप: द रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट'मध्ये सनी देओल, पूजा भट्ट आणि दुलकर सलमानसह अनेक कलाकार आहेत. या चित्रपटाची कथा देखील मनाला भिडणारी आहे जी तुम्ही ZEE5 वर पाहू शकता.
'अ थर्सडे' हा एक चित्रपट आहे, जो तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता. यात यामी गौतम आणि नेहा धुपियासारखे कलाकार दिसले.
'बारोट हाऊस'मध्ये एका कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये एक मुलगा गुन्हा करतो आणि संपूर्ण कथा त्या मुलाभोवती फिरते. हा चित्रपट तुम्ही Zee5 वर पाहू शकता.
'महाराजा'मध्ये विजय सेतुपती आणि अनुराग कश्यप मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा तुम्हाला धक्का देईल आणि तुम्ही ती नेटफ्लिक्सवर पाहू शकता.