Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
2024 ची बेस्ट क्राईम थ्रिलर फिल्म; सायको किलरची अंगावर शहारे आणणारी कहाणी, OTT वर टॉपवर करतेय ट्रेंड
आज आम्ही तुम्हाला 2024 च्या सर्वोत्कृष्ट क्राईम-थ्रिलर चित्रपटाविषयी सांगणार आहोत, या चित्रपटानं रिलीजसोबत ओटीटीवर खळबळ माजवली आहे. चित्रपटाची हृदय पिळवटून टाकणारी कथा पाहिल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल. विशेष बाब म्हणजे, या चित्रपटानं ओटीटीवरील टॉप ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या अनेक क्राईम-थ्रिलर चित्रपट वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. पण, अलिकडेच प्रदर्शित झालेल्या क्राईम-थ्रिलर चित्रपटानं ओटीटीवर खळबळ माजवली आहे. विशेष म्हणजे, IMDb वरही चित्रपटाला उत्तम रेटिंग मिळालं आहे. या सस्पेंस क्राईम-थ्रिलर चित्रपटाचा तुम्ही अगदी घरबसल्या आनंद घेऊ शकता. आम्ही ज्या चित्रपटांबाबत बोलत आहोत, तो म्हणजे, 'सेक्टर 36'.
'सेक्टर 36' हा चित्रपट 2006 मध्ये घडलेल्या निठारी कांड या सत्य घटनेवर आधारित आहे. या प्रकरणानं संपूर्ण देशाला धक्का दिला होता. यामध्ये विक्रांत मेस्सी, दीपक डोबरियाल, दर्शन जरीवाला यांसारख्या स्टार्सनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
'सेक्टर 36' ची कथा एका सायको किलरवर आधारित आहे, जो निष्पाप मुलांना टार्गेट करतो. त्यांचं अपहरण करुन त्यांचा जीव घेतो.
चित्रपटात विक्रांत मेस्सीनं सायको किलर प्रेम सिंहची भूमिका साकारली आहे, जो एका श्रीमंत उद्योगपतीच्या बंगल्याचं रक्षण करतो. घराचा मालक अनेकदा कामानिमित्त बाहेर असतो, त्यावेळी प्रेमसिंह घरात एकटाच असतो.
प्रेमसिंह कॉलनीतील मुलांचं रात्री अपहरण करतो आणि नंतर त्यांना आपल्या घरी आणतो. नंतर तो मुलांना मारतो आणि त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावतो. कॉलनीतील अनेक कुटुंबं आपली मुलं हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करतात.
दरम्यान, हा सायको किलर पोलीस स्टेशन प्रभारी रामचरण पांडे यांच्या मुलीचं अपहरण करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तसं होत नाही. यानंतर राम चरण पांडे मारेकऱ्याचा शोध सुरू करतात. कथा हळूहळू पुढे जाते आणि नंतर एकामागून एक धक्कादायक खुलासे होतात.
सीरियल किलरच्या भूमिकेत विक्रांत मेस्सी दिसतो. तर, दीपक डोबरियाल देखील आहेत. त्यांनी पोलीस इन्स्पेक्टर राम चरण पांडे यांची भूमिरा साकारली आहे. चित्रपटातील काही दृश्य अत्यंत भयावर आहेत.
'सेक्टर 36' तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. महत्त्वाची बाब म्हणजे, चित्रपटानं ओटीटी प्लॅटफॉर्मवर इंडियामध्ये टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये 1 नंबरवर कब्जा केला आहे. आयएमडीबीवर या चित्रपटाला 10 पैकी 7.4 रेटिंग मिळाली आहे. विक्रांत मेस्सी आणि दीपक डोबरियालचा चित्रपट 'सेक्टर 36'ला आदित्य निंबाळकरनं दिग्दर्शित केलं आहे.