Satish Bhosale Khokya: सफेद शर्ट, खांद्यावर बॅग...; खोक्याचं पार्सल बीडकडे रवाना; सतीश भोसलेला आजच न्यायालयात हजर करणार
तरुणाला अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्याला अखेर आज सकाळी (14 मार्च) महाराष्ट्रात आणलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रयागराजमध्ये ताब्यात घेतल्यानंतर खोक्याला रात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई विमानतळावर आणलं. त्यानंतर आज सकाळी साडेसहाच्या सुमारात पोलीस त्याला घेऊन छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले.
सतीश भोसलेने खांद्यावर एक बँग घेतली होती. हीच एक बँग घेऊन तो गेल्या काही दिवसांपासून फिरत होता. तर त्याने सफेद रंगाचे शर्ट घातले होते.
छत्रपती संभाजीनगर विमानतळावरुन तातडीने सतीश भोसलेला घेऊन पोलीस बीडकडे रवाना झाले आहेत.
खोक्याला आज कोर्टात हजर करणार आहेत. खोक्याला शिरुर तालुका कोर्टात हजर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सतीश भोसलेची शिरुर कासार पोलीस स्थानकात वैद्यकीय चाचणी देखील होणार आहे.
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद आहे.
सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले. याआधीही सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे.
अलीकडच्या काळात भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे.