PHOTO : मुहूर्त ठरला! पवारांच्या घरी मंगलकार्य, जय पवारांनी घेतला शरद पवारांचा आशीर्वाद

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केले. त्यामुळे सर्वाचं लक्ष वेधलं गेलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या फोटोत शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह जय पवार हे दिसत आहेत.

पवार कुटुंबीयांसोबत जय पवार असून त्यांच्यासोबत एक तरुणीही दिसत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे द्वितीय चिरंजीव यांचं लग्न ठरलं असून त्यांचा साखरपुडा 10 एप्रिलला पुण्यात होणार आहे.
सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत हा साखरपुडा पार पडणार आहे.
या साखरपुड्यापूर्वी गुरुवारी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी आजोबा शरद पवार यांची पुणे येतील घरी जाऊन भेट घेतली.
जय पवार हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय होते.
निवडणुकीनंतर जय पवार प्रथमच शरद पवारांच्या भेटीला आले होते.