Santosh Deshmukh Case Krushna Andhale : तीन महिने पोलिसांना गुंगारा देणारा कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? CCTV फुटेज समोर, पाहा PHOTOS

बीड येथील मस्सोजाग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिने उलटून गेले आहेत. तरीही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा संतोष देशमुखांच्या हत्येनंतर अजूनही फरार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
फरार आरोपी कृष्णा आंधळे याला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मंदिर परिसरात कृष्णा आंधळे उभा असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
कृष्णा आंधळेने तोंडाला मास्क आणि कपाळाला टिळा लावला होता, असे वर्णन सुद्धा स्थानिकांनी केले आहे.
नागरिकांनी हटकल्यानंतर मोटारसायकल वरून तो पळून गेल्याची माहिती देखील स्थानिकांनी दिली आहे.
मी बघितलेली व्यक्ती कृष्णा आंधळेच होता. तो आता मखमलाबादच्या दिशेने गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
पोलीस या प्रकरणाची खातरजमा करत आहेत.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे.
हे सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती आले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा कृष्णा आंधळेच आहे का? याबाबत अद्याप पुष्टी झालेली नाही. नाशिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.