Chhaava Movie: 'नटसम्राट संतोष जुवेकर आलेत, पण...' ; संतोष जुवेकरच्या अक्षय खन्नाबाबतच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी झोडपलं

Santosh Juvekar Akshaye Khanna Chhaava Movie: गेल्या काही दिवसांपासून छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Santosh Juvekar Akshaye Khanna Chhaava Movie

1/20
'छावा'नं रिलीज होताच पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई केली आणि 2025 चा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला. एवढंच नाहीतर विक्की कौशल स्टारर 'छावा'नं बक्कळ गल्ला जमवत बॉलिवूडच्या दिग्गजांना पाणी पाजलं आहे.
2/20
'छावा'मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विक्की कौशल झळकला असून त्यासोबतच अनेक मराठमोळे कलाकारही या चित्रपटात झळकले आहेत. त्यापैकी एक मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर.
3/20
संतोष जुवेकरनं 'छावा'मध्ये रायाजीची भूमिका साकारली आहे. 'छावा' प्रदर्शित झाल्यापासूनच संतोष जुवेकर चर्चेत होता. पण, 'छावा'मध्ये दमदार भूमिका साकारलेला संतोष जुवेकर सध्या ट्रोल होत आहे.
4/20
संतोष जुवेकरनं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना 'छावा' चित्रपट आणि त्याच्या शुटिंगदरम्यानच्या बऱ्याच आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना "मी अक्षय खन्नाशी बोललोच नाही...", असं वक्तव्य संतोष जुवेकरनं केलं होतं. तेव्हापासूनच संतोष जुवेकरला ट्रोल केलं जात होतं. अशातच आता नेटकऱ्यांनी संतोषच्या वक्तव्यावरुन त्याची चांगलीच उजळणी घेतली असून त्याच्यावरचे मीम्सही व्हायरल होत आहेत.
5/20
संतोष जुवेकरने एका वृत्तवाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यानं शुटिंगचा अनुभव सांगितला. त्यावेळी संतोष जुवेकर म्हणालेला की, "छावा सिनेमात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या, त्या कोणाशीच मी बोललो नाही. शूटिंग सुरू असताना मी तरी त्यांच्याशी बोललो नाही."
6/20
"औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचे शूटिंग सुरू असताना मी लक्ष्मण सरांना भेटायला गेलो होतो. मी सरांना भेटलो, बोललो आणि निघालो. बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण, मी त्याच्याकडे बघितलंपण नाही. माझा काही अक्षय खन्नावर राग नाही. त्यानं उत्तमच काम केलं आहे. पण, माहीत नाही का? त्याच्याशी बोलावंसंच मला वाटलं नाही.", असं संतोष जुवेकर म्हणाला आहे.
7/20
याच वक्तव्यावरुन संतोष जुवेकर सध्या चर्चेत आला आहे. संतोष जुवेकर नेटकऱ्यांच्या टीकेचा धनी झाला आहे. नेटकऱ्यांनी संतोषच्या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
8/20
संतोष जुवेकरची मुलाखत पाहिल्यानंतर त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
9/20
"आपला रोल किती आणि आपण बोलतो किती. किती अतिशयोक्ती… अक्षय खन्ना पेक्षा हाच जास्त इंटरव्ह्यू देतोय...", असं म्हणत एका युजरनं संतोष जुवेकरला फटकारलं आहे.
10/20
दुसऱ्या एका यूजरनं कमेंट करत 'रुबाब केवढा, रोल केवढा', असं म्हणत एका युजरनं संतोष जुवेकरवर टीका केली आहे.
11/20
तर, एका युजरनं लिहिलं आहे की, 'असतात ज्याचे त्याचे उसल... मी 'छावा' पाहिल्यापासून द्राक्ष खाल्ली नाहीत...! सॅबी परेरा'
12/20
एका युजरनं एक मीम शेअर केलं आहे. त्यामध्ये 'द गॉडफादर' चित्रपटातलं एक दृश्य आहे. त्यामध्ये एक व्यक्ती निरोप घेऊन येतो आणि सांगतो की, "नटसम्राट संतोष जुवेकर आलेत, पण बोलणार नाही म्हणाले"
13/20
"संतोष जुवेकर यांनी बोलण बंद केल्यानं आणि भेट न घेतल्यानं तापानं फणफणलेल्या औरंगझेब यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले...", अशी पोस्ट करत औरंगजेबाच्या भूमिकेतल्या अक्षय खन्नाचा हॉस्पिटलमधला फोटो शेअर केला आहे.
14/20
काही दिवसांपूर्वी आलेल्या संगीत मानापमान चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. वर नाही मी बोलत असं मोठ्या अक्षरात लिहिलं आहे. तसेच, त्या पोस्टरच्या डावीकडे आणि उजवीकडे संतोष जुवेकर आणि अक्षय खन्नाचा फोटो आहे.
15/20
आणखी एका युजरनं 'संत्या ए संत्या, बोल की रं माझ्याशी...', अशा कॅप्शनसह औरंगजेबाचा फोटो लावून मीम शेअर केलं आहे.
16/20
'तू बोलला पाहिजे होतास संत्या, तू बोलला पाहिजे होतास...', असं म्हणत संतोष जुवेकरनं मीम शेअर केलं आहे.'
17/20
वेलकम चित्रपटातील नाना पाटेकरांचा फोटो मॉर्फ करुन संतोष जुवेकरचा फोटो लावला आहे आणि मीम शेअर केलं आहे.
18/20
'काय लेका संत्या, बोलला नाही, मेल्यावर माती द्याले तरी येजो लेका!', अशा कॅप्शनसह औरंगजेबाच्या रुपातील अक्षय खन्नाचा फोटो लावून मीम शेअर करण्यात आलं आहे.
19/20
खबरदार चित्रपटातील संजय नार्वेकरांचा फोटो शेअर करत एक धम्माल मीम युजरनं शेअर केलं आहे.
20/20
'हा रोल केल्यानंतर संत्या स्वतःशी दोन वर्ष बोलला नव्हता...'; असं म्हणत एका युजरनं मीम शेअर केलं आहे.
Sponsored Links by Taboola