SIP Investment : बाजारातील अस्थिरतेच्या काळात स्मॉलकॅप, मिडकॅप फंड्सला SIP चा आधार, भागिदारी 50 टक्क्यांवर

शेअर बाजारात अस्थिरता असताना देखील स्मॉलकॅप आणि मिडकॅप म्युच्युअल फंड रिटेल गुंतवणूकदारांची पहिली पसंत आहेत. या फंडमध्ये एसआयपीद्वारे सर्वाधिक गुंतवणूक येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एका रिपोर्टनुसार स्मॉलकॅप फंडच्या असेट अंडर मॅनेजमेंटमध्ये एसआयपीची गुंतवणूक 50 टक्क्यांच्या पुढं पोहोचली आहे. मिडकॅप फंडसमध्ये देखील हिच स्थिती आहे.

मार्च 2024 मध्ये स्मॉल कॅप फंड्समधील एसआयपीची भागिदारी 53 टक्के झालीय. जी मार्च 2019 ला 43 टक्के होती. मिड कॅप फंडमध्ये एसआयपीची भागिदारी 46 टक्के झाली आहे. लार्ज कॅप फंड्समध्ये एसआयपीची भागिदारी 43 टक्के तर फ्लेक्सी कॅपमध्ये एसआयपीची भागिदारी 38 टक्के आहे.
आनंद राठी वेल्थचे डेप्युटी सीईओ फिरोज अजीज यांनी स्मॉल कॅप फंड्स आणि मिड कॅप फंडसनं वेळोवेळी 16 ते 20 टक्के परतावा दिल्याचं म्हटलं. स्मॉल कॅप फंडसमध्ये एसआयपीची भागिदारी वाढत आहे. कारण काही मोठ्या योजना लम्पसम इनफ्लो स्वीकार करत नाहीत. मार्च 2024 मध्ये सेबीनं स्मॉलकॅप व्हॅल्यूएशन्सबाबत चिंता व्यक्त केली होती.मात्र, एसआयपीतून स्मॉलकॅप,मिडकॅप फंड्समध्ये गुंतवणूक वाढत आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)