Vastu Shastra : घरात मांजरीने पिल्लं देणं शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
कुत्रा हा माणसासाठी सर्वात निष्ठावान प्राणी मानला जातो, परंतु मांजरांबाबत धर्मग्रंथांमध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. मांजर भविष्यातील घडामोडींचे संकेत देत असते, असं तुम्ही मोठ्यांकडून ऐकलं असेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमांजरी पाळण्याबाबत लोकांची दोन्ही प्रकारची मतं आहेत. काहींच्या मते, मांजर पाळणं शुभ असतं, तर काहींच्या मते मांजर घरात नकारात्मकता आणि अशुभता आणते.
घरात मांजर येत असेल तर ठीक आहे, पण याच मांजरीने घरात पिल्लांना जन्म दिला तर याचा अर्थ काय? मांजर पाळणं शुभ की अशुभ? सर्व गोष्टींबाबत ज्योतिषी काय सांगतात ते जाणून घेऊया.
ज्योतिषी ऋषिकांत मिश्रा यांच्या म्हणण्याप्रमाणे, घरात मांजर पाळणं अशुभ आहे, कारण मांजर जिथे राहते, तिथे नकारात्मक शक्ती आणि ऊर्जा सक्रिय होतात.
याशिवाय घरात मांजर असल्यामुळे राहु तत्व देखील सक्रिय होते, ज्यामुळे घरातील लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं
त्यातल्या त्यात घरात सोनेरी रंगाची मांजर असणं खूप शुभ मानलं जातं. सोनेरी मांजर घरात शुभवार्ता आणते.
तपकिरी/ सोनेरी मांजरीच्या येण्याने घरात संपत्तीचे इतर मार्ग देखील उघडू शकतात. एवढंच नाही, तर तुमची प्रलंबित कामं देखील यशस्वी होतील आणि अडकलेले पैसेही परत मिळू शकतील.
मान्यतेनुसार, जर अचानक एखादी काळी मांजर तुमच्या घरात आली आणि रडू लागली तर ते अशुभ लक्षण आहे. मांजरींचं ओरडणं, रडणं हे एखाद्या अप्रिय घटनेचे संकेत देते. रात्रीच्या वेळी मांजरीचं ओरडणं वाईट बातमीचं लक्षण मानलं जातं.
जर तुमच्या घरात मांजरीने बाळाला जन्म दिला तर ते घराच्या प्रमुखासाठी खूप शुभ मानलं जातं. मांजरीने पिल्लांना जन्म दिल्याच्या 90 दिवसांत कुटुंबातील सदस्य प्रगती करू शकतात आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात.
घरात मांजरीचं पिल्लू जन्माला आल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाहीत.