Dharashiv : तुळजाभवानी मंदिरातील 35 वर्षांपासून बंद असलेला नैसर्गिक झरा पुन्हा नव्याने सुरु; भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण, पाहा फोटो

Dharashiv : तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने सध्या मंदिर परिसरातील विविध विकासकामे सुरू आहेत.

Dharashiv

1/5
त्यापैकीच एक असलेल्या श्री गोमुख तीर्थकुंडाचे काम सुरू असून श्री गोमुख तीर्थकुंडाला पुरातन रूप देण्यात येत आहे.
2/5
तीर्थकुंडाचे काम सुरू असताना 1988 पासून बंद असलेला नैसर्गिक झरा पुन्हा नव्याने सुरू झाला आहे. 35 वर्षापासून हा झरा बंद होता.
3/5
पाण्यातील क्षारामुळे झऱ्याचा नैसर्गिक मार्ग बंद झाला होता तसेच झऱ्याच्या मार्गात 1986 सालची नाणी आढळून आली आहेत.
4/5
झऱ्याच्या मार्गातील क्षार आणि आसपासचा थर काढण्यात आला आहे. तसेच, झऱ्याच्या मार्गातील जुनी नाणी काढण्यात आल्यानंतर 35 वर्षापासून बंद असलेला झरा पुन्हा एकदा नव्याने सुरू झाला आहे.
5/5
त्यामुळे श्री तुळजाभवानी देवींच्या भक्तामध्ये आनंदाचे वातावरण आहे.बालाघाटच्या डोंगर रांगातील पाणी नैसर्गिकरित्या या झऱ्यातून देवीच्या मंदिरात पोहोचते.
Sponsored Links by Taboola