बँकेकडून कर्ज घेताना तुमची होऊ शकते 'अशी' फसवणूक, जाणून घ्या पैसे कसे वाचवायचे?
बँका ग्राहकांना दिलेल्या कर्जावर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे चार्जेस लावतात. कर्जासाठीच्या अटी आणि शर्ती या सामान्य माणसाच्या आकलनापलिकडे असतात. त्याचाच फायदा अनेक बँका घेतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक बँका कर्ज अप्रुव्ह झाले, त्या दिवसापासून कर्जाच्या रकमेवर व्याज आकारतात. खरं म्हणजे कर्ज मंजूर झाले त्या दिवसापासून व्याज घेण्याऐवजी कर्जदाराच्या खात्यात ज्या दिवशी रक्कम पडली, त्या दिवसापासून व्याज आकारायला हवे.
काही बँका चेकद्वारे कर्ज देतात. अनेक बँका चेकवर असलेल्या तारखेपासून कर्ज आकारतात. प्रत्यक्ष बघायचे झाल्यास चेकवर असलेल्या तारखेच्या अनेक दिवसांनी ग्राहकाच्या हातात चेक पडू शकतो. तसेच त्यापेक्षाही उशिरा कर्जदाराच्या खात्यात रक्कम जमा होते. त्यामुळे ज्या दिवशी खात्यात रक्कम जमा झाली, त्या दिवसापासून रक्कम व्याज आकारायला हवे.
अवघ्या काही दिवसांचे कर्ज शिल्लक राहिले असले तरी काही बँका कर्जाराकडून संपूर्ण महिन्यासाठी व्याज आकारतात.
कर्ज देताना काही बँका एक किंवा दोन हफ्ते अगोदरच वसूल करतात. पण व्याज मात्र संपूर्ण कर्जावर लागू करतात. तुमच्यासोबतही असाच प्रकार घडतोय का हे तपासणे गरजेचे आहे.