Twitter Bird Logo : फर्निचर अन् ट्विटर बर्ड स्टॅच्यू; एलन मस्कनं विकल्या ट्विटरच्या ऑफिसमधल्या वस्तू, 'या' किमतीला झाली विक्री
एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरच्या (Twitter) शेअर्समधील मोठी हिस्सा खरेदी केला. ही ट्विटर डील चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर ट्विटर कंपनीला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appट्विटरची मालकी मिळताच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं यानंतरही कंपनीचं नुकसान काही कमी झालेलं नाही.
त्यामुळे आता मस्क यांच्यावर ट्विटरच्या ऑफिसमधील वस्तू विकण्याची वेळ आली आहे.
मस्क यांनी टेक फर्मच्या डाऊनटाऊन सॅन फ्रान्सिस्को कार्यालयातून फर्निचर, सजावट, स्वयंपाकघरातील सामान आणि इतर बऱ्याच काही वस्तूंचा लिलाव केला आहे.
18 जानेवारी रोजी, बुधवारी मस्क यांनी ऑफिसमधील ट्विटर 'बर्ड' स्टॅच्यू 1,00,000 डॉलर किमतीला विकला आहे.
ट्विटरच्या कॉर्पोरेट ऑफिसच्या मालमत्तेसाठी ऑनलाईन लिलाव आयोजित करण्यात आला होता. हा लिलाव 24 तासांपेक्षा जास्त काळ सुरु होता.
या लिलावात ट्विटर बर्ड लोगो असलेले 10-फूट निऑन लाईट ही विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. ही निऑन लाईट 40,000 डॉलर किमतीला विकली गेली. हेरिटेज ग्लोबल पार्टनर्सने हा लिलाव केला होता.
या लिलावात 631 व्या लॉटमध्ये एस्प्रेसो मशीन, एर्गोनॉमिक्स डेस्क, टीव्ही, सायकल चार्जिंग स्टेशन, पिझ्झा ओव्हन आणि @ चिन्हाच्या आकाराचा एक सजावटीच्या वस्तूचा समावेश होता.
मस्क यांनी डिसेंबरमध्ये सांगितले की, ट्विटर कंपनीने खर्च कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. आगामी काळातही अनेक निर्णय घेण्यात येतील.