Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Photo : कापसाचे दर घसरले, शेतकऱ्यांनी विक्री थांबवली; जिनिंग बंद
सध्या कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरात घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करण्याचा निर्णय घेतल आहे. अनेक शेतकऱ्यांनी (Farmers) कापूस घरातच साठवूण ठेवला आहे. त्यामुळं राज्यातील कापसावर प्रक्रिया करणारे जवळपास 80 टक्के जिनिंग बंदच आहेत.
यंदा राज्यात कापूस उत्पादन चांगलं झालं आहे. मात्र, सध्या कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना कापूस विक्री न करता आपल्या घरात कापूस ठेवावा लागत आहे.
कापसाला चांगला भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. यामुळं राज्यातील कापसावर प्रक्रिया करणारे जवळपास 80 टक्के जिनिंग बंदच आहेत.
राज्यात सुमारे 500 च्यावर जिनिंग व त्यात काम करणारे सुमारे 3 लाख मजूर आहेत. ज्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे.
पश्चिम विदर्भातील कापूस हा उच्च दर्जाचा असून त्याचा लांब धागा निघत असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया यासारख्या देशांमध्ये मोठी मागणी
यंदा कापसावर प्रक्रिया करणारे जिनिंग कापसाअभावी बंदच आहेत. त्यामुळं राज्यातील कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुणावत आहे.
शेतकऱ्यांना उत्पादनावर आधारित भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांसह जिनिंग चालकही संकटात सापडले आहेत. यावर अवलंबून असलेले तीन लाख कामगार देखील संकटात सापडले आहेत.
मागील वर्षी कापसाच्या गुणवत्तेनुसार 10 हजारापासून ते 13 हजार रुपयापर्यंत भाव मिळाला होता. यंदा मात्र, हा कापूस दर अद्यापही आठ ते साडेआठ हजार रुपयांवर स्थिरावला आहे.
अधिक भाव वाढ होईल या आशेने शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळ असलेला कापूस विक्रीसाठी न आणता तो घरातच राखून ठेवणं पसंत केलं आहे.