Toor Dal Price : डाळीच्या वाढत्या किमतीबाबत सरकारने उचललं कडक पाऊल, सर्वसामान्यांना होणार फायदा
दिवसेंदिवस महागाई वाढताना दिसत आहे. डाळींचे भाव सातत्याने वाढताना दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतूर आणि उडीद डाळीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत.
गेल्या काही काळापासून अन्नधान्याच्या किमतीत विक्रमी वाढ पाहायला मिळत आहे. आता केंद्र सरकारने यावर उपाय म्हणून मोठं पाऊल उचललं आहे. यामुळे नागरिकांनी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सरकारने साठेदारीवर तोडगा म्हणून मर्यादा लागू केली आहे. ऑक्टोबरपर्यंत साठ्यावर मर्यादा लागू करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, आयातदार आणि मिलर्सकडे ठेवलेल्या तूर आणि उडीद डाळीवर स्टॉक मर्यादा लागू केली. यामुळे साठा कमी होईल, त्यामुळे तूर आणि उडदाचे भाव घसरतील किंवा भाव स्थिर राहू शकतात.
केंद्र सरकारने तूर आणि उडीद डाळीच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी विशेष पाऊल उचललं आहे, यामुळे ग्राहकांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे डाळींचे भाव घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने तात्काळ साठवण क्षमतेसंदर्भात आदेश लागू केले आहेत. बेहिशेबी साठेदारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हे कडक पाऊल उचललं आहे.
शुक्रवारी तूर डाळीची सरासरी किरकोळ किंमत 19 टक्क्यांनी वाढून 122.68 रुपये प्रति किलो झाली. एका वर्षापूर्वी ही किंमत 103.25 रुपये प्रति किलो होती.
दुसरीकडे, उडीदाची सरासरी किरकोळ किंमत 5.26 टक्क्यांनी वाढून 105.05 रुपयांवरून 110.58 रुपये प्रति किलो झाली आहे.