Home Loan Interest: आशियातील 'या' देशांमध्ये इतके आहे गृहकर्जाचे व्याजदर, भारतात गृहकर्जाचे व्याजदर किती?
गेल्या दीड वर्षात जगभरात व्याजदर झपाट्याने वाढले आहेत. चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात सातत्याने वाढ केली आहे. याचा सर्वाधिक परिणाम गृहकर्जांवर झाला असून ते महाग झाले आहेत.जाणून घेऊया आशियातील प्रमुख देशांमधील गृहकर्जाचे व्याजदर.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appव्हियेतनाम - व्हियेतनाम हा देश आशियातील उत्पादन केंद्रांपैकी एक आहे. इथे सध्या गृहकर्ज सर्वात महाग आहे. अर्बन लँड इन्स्टिट्यूटच्या 2023 एशिया पॅसिफिक होम अफोर्डेबिलिटी इंडेक्सनुसार, व्हियेतनाममध्ये सध्या गृहकर्जाचे व्याजदर किमान 13 टक्के आहे.
भारत - महाग गृहकर्ज असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. मागील एका वर्षामध्ये भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या रेपो दरात 2.50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे येथे गृहकर्जातील व्याजदरात देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात गृहकर्जाचे व्याजदर 7.85 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे.
इंडोनेशिया - इंडोनेशियामध्ये गृहकर्जाचे व्याजदर सध्या 6.50टक्के ते 7.25 टक्क्यांच्यामध्ये आहे.
दक्षिण कोरिआ - दक्षिण कोरिआ हा आशियाई देशांमधली एक प्रमुख अर्थव्यवस्था आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात हा देश महत्त्वाची भूमिका बजावतो. दक्षिण कोरिआमध्ये गृहकर्जाचे व्याजदर सध्या 5.64टक्के इतके आहे.
चीन - चीन ही आशिया खंडातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. चीनमध्ये गृहकर्जासाठीचे व्याजदर हे चीनमधील प्रांतांवरुन ठरवले जाते. सध्या चीनमध्ये 3.90 टक्के ते 4.85टक्के व्याजदर आहे.
हाँगकाँग - हाँगकाँगच्या मुख्य भागात चीनकडून अनेक बाबतीत स्वायत्तता देण्यात आली आहे. त्यामुळे इथे चीनपेक्षा गृहकर्जाचे व्याजदर फार कमी म्हणजेच 2.75 टक्के इतके आहे.
सिंगापुर - एकेकाळी आशियाच्या विकासाचा चेहरा असलेल्या या देशातील गृहकर्जांचे व्याजदर 2.20 ते 2.60 टक्क्यांच्या दरम्यान आहेत. या देशाच्या अर्थव्यवस्थेतील रिअल इस्टेट आणि पर्यटन ही दोन प्रमुख क्षेत्रे आहेत.
जपान - चीननंतर जपान ही आशियातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. हा देश कमी व्याजासाठी प्रसिद्ध आहे. हेच कारण आहे की जपानमध्ये सर्वात स्वस्त गृहकर्ज उपलब्ध आहे. या देशात गृहकर्जाचे व्याजदर फक्त 0.49 टक्के आहे.