सीबील स्कोर बाबत रिझर्व्ह बँकेचे हे 6 नवीन नियम जाणून घ्या !
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
03 Dec 2024 12:35 PM (IST)
1
CIBIL दर 15 दिवसांनी अपडेट होणार म्हणजेच आत महिन्यातून दोन वेळेस.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
CIBIL तपासण्यासाठी ग्राहकाला माहिती पाठवावी लागणार. ही माहिती एसएमएस किंवा ईमेलद्वारे पाठविली जाऊ शकते.
3
ग्राहकाची कोणतीही विनंती नाकारली गेली तर त्याला त्याचे कारण सांगणे आवश्यक आहे. यामुळे ग्राहकाला त्याची विनंती का नाकारली गेली हे समजणे सोपे होईल.
4
वर्षातून एकदा ग्राहकांना मोफत क्रेडिट रिपोर्ट तपासता येणार.
5
ग्राहक डिफॉल्ट होणार असेल तर डिफॉल्टची तक्रार करण्यापूर्वी ग्राहकाला एसएमएस किंवा ईमेलद्वारे माहिती देणे आवश्यक असेल.
6
जर क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीने ग्राहकांच्या तक्रारीचे 30 दिवसांत निराकरण केले नाही, तर त्यांना प्रतिदिन 100 रुपये दंड भरावा लागेल.