Jejuri Khandoba : जेजुरीगडावर चंपाषष्ठीचा उत्सव; खंडेरायावर हळदीची उधळण, गडावर लोटला भाविकांचा जनसागर
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाचा चंपाषष्टी उत्सव जेजुरी गडावर अतिशय जल्लोषात सुरू आहे. काल सोमवारी जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसायंकाळच्या सुमारास जेजुरी गडावर खंडोबा आणि म्हाळसा देवीला तेलवन करून हळद लावण्यात आली.
चंपाषष्टी उत्सवानिमित्ताने जेजुरी गडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
लाखो भाविक या चंपाषष्ठीच्या काळात गडावर येत असतात.
जेजुरी गड हा विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाला आहे.
जेजुरी गडाची ड्रोनची दृश्य खास माझाच्या प्रेक्षकांसाठी...
चंपाषष्ठीनिमित्त स्थानिक नागरिकांसह राज्यभरातील भाविक जेजुरीला येऊन कुलधर्म कुलाचाराचा विधी करतात.
या काळात श्री खंडेरायाला भरीत रोडग्याचा विशिष्ट नैवेद्य दाखवला जातो.
चंपाषष्ठीनिमित्त अनेक नागरिक जेजुरीला सहकुटुंब दर्शनाला येतात.
पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, सोलापूर, मुंबई, कोकण, नगरसह राज्यभरातील भाविक गडावर दाखल झाले आहेत.