अमिताभ ते माधुरी, दिग्गजांची कोट्यवधीची गुंतवणूक, स्विगीच्या आयपीओमध्ये असं नेमकं काय आहे?
सध्या स्विगीच्या आयपीओची सगळीकडे चर्चा आहे. हा आयपीओ येत्या 6 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App8 नोव्हेंबर 2024 पर्यंत या आयपीओत पैसे गुंतवता येणार आहेत. 11 नोव्हेंबर रोजी या आयपीओचे अलॉटमेंट होईल. तर अयशस्वी गुंतवणूकदारांचे पैसे 12 ऑक्टोबर रोजी परत दिले जातील.
स्विगी ही कंपनी येत्या 13 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारावर लिस्ट होणार आहे. या कंपनीत अनेक दिग्गजांनी गुंतवणूक केलेली आहे. माजी क्रिकेटर राहुल द्रविड, जहीर खान, टेनिसपटू रोहन बोपन्ना, दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता आणि उद्योजक आशिष चौधरी आदी बड्या लोकांनी या कंपनीत गुंतवणूक केलेली आहे.
स्विगी या कंपनीत अभिनेत्री माधुरी दीक्षित हिनेदेखील कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत. दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सेकंडरी मार्केटमधून काही शेअर्स खरेदी केलेले आहेत. मोतीलाल ओस्वाल फायनॅन्शियल सर्व्हिसेसचे रामदेव अग्रवाल यांनीदेखील स्विगी कंपनीत कोट्यवधीची गुंतवणूक केली आहे.
स्विगीच्या आयपीओचा किंमत पट्टा 371-390 रुपए प्रति शेअर असा आहे. या कंपनीने आयपीओतील फ्रेश इक्विटीची विक्री वाढवून 4,499 कोटी रुपये केली आहे.
स्विगीने आयपीओतील ओएफएसची साईज कमी करून 17.5 कोटी रुपये केली आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)