Vitthal-Rukmini: पाडव्यानिमित्त विठुरायाला सोन्याची पगडी अन् धोतर; रुक्मिणी माता सजली नखशिखांत हिऱ्याच्या दागिन्यात, पाहा PHOTOS
आज दीपावली बालप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा असून या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीचे ऐश्वर्य संपन्न रूप आज भाविकांना पाहायला मिळाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळी पाडवा निमित्त दुपारी पोशाखावेळी श्री विठ्ठलास सोन्याची पगडी, कौस्तुभ मणी, नाम निळाचा, हिऱ्यांचे कंगन जोड, दंडपेठ्या जोड, मोत्याची कंठी दोन पदरी पाचूचा लोलक त्याचबरोबर मोत्याची कंटी दोन पदरी, मोत्याचा तुरा, शिरपेच लहान, मत्स्य जोड, सोन्याचे पितांबर, नवरत्नाचा हार, हिऱ्यांचे पैंजण, सोन्याचा करदोडा, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ, तोडेजोड असे मौल्यवान पुरातन दागिने परिधान करण्यात आले होते.
श्री रुक्मिणी मातेस जडावाचे मुकुट, जडावाचे हार, नवरत्नाचा हार, जडावाचे बाजूबंद, खड्यांची वेणी, पाचूची गरसोळी, चिंचपेटी हिरवी, गोट, ठुशी, मासपट्टा, शिंदे हार परिधान करण्यात आला आहे.
त्याचबरोबर रूक्मिणी मातेला सोन्या मोत्याचे ताणवड, चंद्र, सूर्य, मोत्याचा कंठा, पेठयाची बिंदी, मन्या मोत्यांच्या पाटल्या, सोन्याचे बाजूबंद, रुळ जोड, पैंजण जोड, वाळ्या जोड, मोठी नथ, सोन्याचा करंडा, छत्रछामर, तारामंडळ, चंद्रहार मोठा, सोन्याची साडी, इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.