फक्त महिनाभर पाहा वाट, 'हे' चार स्टॉक मारणार चौकार; 30 दिवसांत तुम्हाला करणार मालामाल?
ब्रोकरेज हाउस ॲक्सिस डायरेक्ट (Axis Direct) या ब्रओकरेज हाऊसने 5 ते 30 दिवसांसाठी काही शेअर्स सूचवले आहेत. यातील पहिला शेअर हा Hikal हा आहे. या शेअरमध्ये 5 ते 15 दिवासांसाठी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. त्यासाठी टार्गेट 354 रुपये तर स्टॉपलॉस 310 ठेवायला हवे. तर खरेदी करण्याची रेंज ही 318- 321 रुपये असावी, असे या ब्रोकरेज हाऊसने सूचवले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appॲक्सिस डायरेक्ट या ब्रोकरेज हाऊनसे CDSL या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास सूचवले आहे. आगामी 5 ते 15 दिवसांसाठी गुंतवणूक करायची असेल तर 2,132 रुपये टार्गेट आणि 1,940 रुपयांचा स्टॉपलॉस असायला हवा. तसेच बाइंग रेंज ही 1,965-1,988 रुपये असावी, असे या ब्रोकरेज हाऊसने सूचवले आहे.
Macrotech Devel हा शेअरदेखील गुंतवणुकीसाठी चांला आहे. 5 ते 30 दिवसांसाठी 1,279 रुपयांचे टार्गेट तर 1,153 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवायला हवा, असे ॲक्सिस डायरेक्ट या ब्रोकरेज हाऊसने सांगितले आहे. त्यासाठी बाइंग रेंज 1,195 रुपये असावी, असेही या ब्रोकरेज हाऊसने सूचवले आहे.
ॲक्सिस डायरेक्ट या ब्रोकरेज हाऊसने Usha Martin या कंपनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 5 ते 15 दिवसांसाठी 378 रुपयांचे टार्गेट तसेच 330 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असे या ब्रोकरेज हाऊसने सूचवले आहे. तसेच या स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची असेल तर बाईंग रेंज ही 334-338.80 रुपये असावी, असेही या ब्रोकरेज हाऊसने म्हटले आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)