'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
विधानसभेच्या तोंडावर आपापल्या विधानसभा मतदारसंघात रॅल्या, मिरवणूका कायम होत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसेलिब्रिटी आमदार म्हणून ओळख असणाऱ्या सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची लोकप्रियता नेहमीच विविध घटनांतून समोर येत असते .
यलमार भवन बांधण्यासाठी एक कोटी निधी दिल्याने समाजाने शहाजीबापू यांना बग्गीमध्ये बसवून जेसिबीने फुले उधळत जंगी मिरवणूक काढली .
यानंतर यलमार समाजाच्या वतीने सांगोला ते यलमार मंगेवाडी गावापर्यंत शहाजी बापूंची सजवलेल्या बग्गीत बसवून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत पुष्पवृष्टी करण्यात आला . यावेळी मागे 'पाटील आला' हे गाणे वाजवण्यात येत होते.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच विजयी जल्लोषा सारखी शहजिबापुंची मिरवणूक निघाल्याने कार्यकर्ते उत्साहात आहेत .