सरकारची 'ही' महारत्न कंपनी देणार तगडे रिटर्न्स, गुंतवणूक केल्यास होणार जबरदस्त फायदा?
PSU Stocks to Buy: सध्या शेअर बजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीचा फायदा घेत काही गुंतवणूकदार चांगल पैसे कमवत आहेत. दरम्यान,ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओस्वालने (Motilal Oswal) महारत्न दर्जा असेलल्या काही सरकारी कंपन्यांत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशॉर्ट टर्मसाठी या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो, असा दावा मोतीलाल ओस्वालने केला आहे.
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओस्वालच्या (Motilal Oswal) म्हणण्यानुसार गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच GAIL ही कंपनी तुम्हाला आगामी दोन ते तीन दिवसांत चांगला परतावा देऊ शकते. ब्रोकरेज फर्मने दोन ते तीन दिवसांसाठी या स्टॉकची टार्गेट प्राईज 265 रुपये ठेवली आहे.
15 जुलै 2024 रोजी हा शेअर 238 रुपयांवर पोहोचला होता. आगामी काळात या शेअरचे मूल्य 11-12 टक्क्यांनी वाढू शकते
गेल्या काही दिवासांपासून GAIL ही कंपनी शेअर बाजारात चांगली कामगिरी करत आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 115 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. सहा महिन्यात कंपनीने 41 टक्क्यांनी परतावा दिला आहे.
तीन महिन्यांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
एका महिन्याचा विचार करायचा झाल्यास GAIL कंपनीने आपल्या भागधारकांना 7 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
या कंपनीचे बाजार भांडवल 1.55 लाख कोटी रुपये आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)