MI vs RCB WPL 2025 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! थेट फायनल खेळायचे स्वप्न भंगले; RCBचा शेवट 'गोड'

महिला प्रीमियर लीग (WPL)2025च्या लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला 11 धावांनी पराभूत करून हंगामाचा शेवट गोड केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 199 धावा केल्या.

प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्सना 9 विकेट्सच्या मोबदल्यात फक्त 188 धावा करता आल्या.
पण, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने आधीच प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे.
आरसीबीकडून कर्णधार स्मृती मानधनाने 37 चेंडूत 53 धावांची शानदार खेळी केली.
एलिस पेरीने 38 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या तर रिचा घोषने 22 चेंडूत 36 धावांचे योगदान दिले.
मुंबई इंडियन्सकडून नॅट सायव्हर-ब्रंटने 35 चेंडूत 69 धावांची शानदार खेळी केली, परंतु त्याची कामगिरी संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसे नव्हती.
सजीवन सजनाने 12 चेंडूत 23 धावा केल्या, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 18 चेंडूत 20 धावांचे योगदान दिले.