Stock Market Crash : शेअर मार्केटमध्ये भूकंप, सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला, निफ्टीचं काय झालं?
शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी शेअर विक्र केल्यानं सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला. एनएसईवर निफ्टी देखील 310 अंकांनी घसरला. बँकिंग, ऑटो स्टॉक्समध्ये जोरदार विक्री पाहायला मिळाली. बँक निफ्टी 700 अंकांनी घसरली. निफ्टी बँकेच्या 12 शेअरमध्ये घसरण झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीएसईवरील 4045 शेअर्सपैकी 1695 शेअर्समध्ये तेजी तर 2244 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. 350 शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागलं. तर 199 शेअरमध्ये लोअर सर्किट लागलं.
सेन्सेक्समधील 30 शेअरपैकी 28 स्टॉक्समध्ये घसरण पहाायला मिळाली. आयटीसी आणि अदानी पोर्टस या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळते.
भारती एअरटेल, टिसीएस, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँक, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व, रिलायन्सच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक 18 डिसेंबर 2024 ला होणार आहे. त्यामध्ये मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत 2025 साठी व्याज दर कपात होणार का याकडे लक्ष लागलं आहे. दुसरीकडे रुपया देखील कमजोर होत आहे.