Toss The Coin च्या गुंतवणूकदारंना लॉटरी, 1000 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला लिस्टिंगला दुप्पट परतावा
युवराज जाधव
Updated at:
17 Dec 2024 11:40 AM (IST)
1
टॉस द कॉइन या कंपनीचा आयपीओ बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाला आहे. आयपीओ लिस्ट होताच शेअरला अप्पर सर्किट लागलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आयपीओचा किंमतपट्टा 182 रुपये निश्चित केला होता. आयपीओ 90 टक्के प्रीमियमसह 345.80 रुपयांवर लिस्ट झाला. तर, गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा मिळाला.
3
टॉस द कॉइनचा आयपीओ लिस्ट होताच शेअरला अप्पर सर्किट लागलं असून शेअर 363.05 रुपयांवर पोहोचला आहे.
4
विशेष बाब म्हणजे या कंपनीचा आयपीओ 1000 पट सबस्क्राइब झाला होता. या कंपनीनं 9.17 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी 5.04 लाख शेअर जारी करण्याचा निर्णय घेतला होता.
5
आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल झाले असून टॉस द कॉइन लिमिटेडच्या आयपीओतून चांगली कमाई केली.