Railway Stocks : रेल्वे स्टॉक्समध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांना वर्षभरात दमदार परतावा, शेअर बाजारात काय घडलं?
शेअर बाजारात रेल्वे क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये 7 टक्के तेजी पाहायला मिळाली. गुंतवणूकदार रेल्वे क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्ड खरेदी करण्यासाठी उत्सुक पाहायला मिळाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरवीएनएलच्या शेअरमध्ये 3 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे.RVNL चा शेअर 435.95 रुपयांवरुन बाजार बंद होईपर्यंत 446.80 रुपयांवर पोहोचला. गेल्या 6 महिन्यात आरवीएनएलचा शेअर घसरला असला तरी वर्षभरात या शेअरमधून गुंतवणूकदारांना 162.95 टक्के परतावा मिळाला आहे.
IRFCच्या शेअरमध्ये 3 टक्के तेजी पाहायला मिळाली. बाजार बंद झाला तेव्हा या कंपनीचा शेअर 150.95 रुपयांवर होता. गेल्या महिनाभरात या कंपनीचा शेअर 12 टक्क्यांनी वाढला आहे.
IRCON International LTD या कंपनीच्या शेअरमधये 7 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. बाजार बंद झला तेव्हा 211.70 रुपयांवर पोहोचला होता. आठव्यात 12 टक्के तेजी या शेअरमध्ये आली आहे.
दरम्यान, आज शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. आजचा कारभार संपला तेव्हा सेन्सेक्स 230.02 अंकानी वाढून 80234.08 वर बंद झाला. तर निफ्टी 0.33 टक्के म्हणजेच 80.40 अंकांच्या तेजीसह बंद झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)