गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
रत्नागिरीतल्या सावर्डे गावामध्ये खैराच्या लाकडाचा अवैद्यरित्या साठा ठेवणाऱ्या तीन कंपन्यांवर नाशिक वन विभागाने कारवाई केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अवैध लाकडाचा साठा करणाऱ्या कंपनीतील सगळा मुद्देमाल जप्त करत सावर्डेतील तीन कंपन्या नाशिक वनविभागाने सील केल्या आहेत. त्यामुळे, नाशिकमधील लाकूड विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गुजरात सीमेवरील अवैद्यरित्या खैराची तोड करून रत्नागिरीमधील सावर्डेत आणून विकणाऱ्या चौघांना नाशिक वनविभागाने ताब्यात घेतल्यानंतर चौकशीचे धागेदोरे थेट कोकणात सापडल्याने मोठी खळबळ उडाली.
चिपळूणमधील सावर्डे येथील पाकळे यांच्या सचिन कात फॅक्टरी, तिरुपती कात उद्योग कंपनीसह सिंडिकेट फुडस कंपनी अशा तीन कंपन्या वनविभागाने सील केल्या आहेत.
साधारण लाकाडपेक्षा ह्या लाडकाचा वापर अधिक केला जातो, पूजा-हवन याकामी या लाकडाचा वापर होतो. वन विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत एकू 80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच झालेल्या कारवाईमुळे खळबळ जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातही या घटनेची व कारवाईची चर्चा रंगली आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुत्रांकडून माहिती मिळताच गावात दडून ठेवलेल्या या लाडकी कारखान्यावर छापा मारुन मुद्देमाल जप्त केला आहे