PHOTOS : आळंदीत कार्तिकी वारीनिमित्त लाखो भाविकांचा मेळा; हरिनामाच्या गजराने आळंदी दुमदुमली
यात्रे अलंकापुरा येती ! ते आवडी विठ्ठला !! कार्तिकी वारीनिमित्त आळंदीत लाखो भाविकांचा महामेळा भरला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविश्रांतीचे स्थान संतांचे माहेर । तें या भूमीवर अलंकापूर ।। तयें स्थळी माझा जीवींचा वो ठेवा । नमीन ज्ञानदेवा जाऊनीयां ।। ही भावना उरी ठेवून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली लाखो वैष्णवांची मांदियाळी आळंदीतील कार्तिक वारी सोहळा अनुभवण्यासाठी दाखल झाली आहे
माऊलीनामाचा जयघोष करत आलेल्या वारकऱ्यांची पावलं माउलींच्या संजीवन समाधीदिन सोहळ्यासाठी गेल्या चार दिवसांपासून विसावली आहेत.
शहरात सर्वच रस्त्यांवर वारकऱ्यांचा उत्साह आणि हरिनामाच्या गजराने आळंदी दुमदुमून गेली आहे.
कार्तिकी वारी निमित्त लाखों भाविक अलंकापुरीत दाखल झालेत.
कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य ज्ञानेश्वर माऊलींच्या 728 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला केलेल्या नेत्रदीपक रोषणाई केली आहे.
DRONE च्या माध्यमातून टिपलेले ली खास दृश्य ABP माझाच्या प्रेक्षकांसाठी...
इंद्रायणीतीरी टाळ-मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’ आणि भगवा झेंडा उंचावत फेर-फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
मंगळवारी पहाटेपासूनच नगरप्रदक्षिणा मार्ग दिंड्या आणि पालख्यांमधील भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता.
माउलींच्या पालखी नगरप्रदक्षिणेवेळी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला.
साडेतीन लाखांहून अधिक भाविक आळंदीत दाखल झाले आहेत.
कार्तिकी एकादशीनिमित्त पवित्र इंद्रायणीत स्नान करून लाखो भाविकांनी ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीचे डोळेभरून दर्शन घेतले.
पारी साडेबाराच्या महानैवेद्यानंतर माउलींच्या चांदीच्या मुखवट्याची सजावट व पोशाख परिधान करण्यात आला.
दुपारी दीडच्या सुमारास माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी महाद्वारातून बाहेर पडली.
यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
शनी मंदिरापासून फुलवाले धर्मशाळा, चाकण चौक, भैराबा चौकमार्गे निघालेला हा सोहळा हजेरी मारुतीजवळ येऊन काही वेळापुरता विसावला.