Photo: शेअर बाजारात आज मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे चार लाख कोटी रुपये बुडाले
शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला असल्याचं दिसून आलं. त्यामुळे बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 727 अंकांची घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 206 अंकांची घसरण झाली.
सेन्सेक्समध्ये आज 1.19 टक्क्यांची घसरण होऊन तो 60,250 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये आज 1.14 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,911 अंकांवर स्थिरावला.
आज निफ्टी बँकमध्ये 1,042 अंकांची घसरण होऊन तो 41,690 अंकांवर स्थिरावला. आज शेअर बाजार बंद होताना जवळपास सर्वच क्षेत्रांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं.
आज बँक, पॉवर, रिअॅलिटी तसेच सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये दोन ते तीन टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचं दिसून आ
बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 1.5 टक्क्यांची तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.8 टक्क्याची घसरण झाली.
Adani Ports, SBI, IndusInd Bank, HDFC Bank आणि Cipla या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं.
तर Hindalco Industries, Maruti Suzuki, Bajaj Auto, HUL आणि Tata Steel या निफ्टीमध्ये काहीशी वाढ झाली.
शेअर बाजारात आज एकूण 1106 शेअर्समध्ये वाढ झाली तर 2310 शेअर्समध्ये घट झाली. आज एकूण 129 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
डॉलरच्या किंमतीत आज रुपयाच्या किमतीमध्ये 13 पैशांची वाढ झाली. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 81.59 इतकी आहे. सोमवारी ही किंमत 8..72 इतकी होती.