Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amravati News: कापसाच्या दरात घसरण, अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक
47 वर्षानंतर अमरावती जिल्ह्यातील बहिरममध्ये कापूस आंदोलनाची ठिणगी पडली. कापूस जाळून शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी (Cotton Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण कापसाच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे.
दरात घसरण झाल्यामुळं अमरावती (Amravati) जिल्ह्यातील बहिरम इथं शेतकऱ्यांनी आंदोलन (Farmers Agitation) केलं. तब्बल 47 वर्षानंतर बहिरममध्ये कापूस आंदोलनाची ठिणगी पडली. यावेळी शेतकऱ्यांनी कापूस जाळून सरकारचा निषेध केला.
कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत. दर नसल्यामुळं शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे. कापसाच्या दरात नेमकी कधी वाढ होणार याची शेतकरी वाट बघत आहेत.
मागील वर्षी कापसाला 11 ते 12 हजार रुपयांचा असणारा दर 8 ते साडेआठ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
बहिरम परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी स्वयंम स्फूर्तीनं कापसाचे गाठोळे आणून जाळले. कापसाचे भाव पाडल्यामुळं शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.
केंद्र सरकारने कापसाच्या आयातीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियातून 51 हजार टन कापूस आयात केला आहे. तसेच त्यावरील 11 टक्के आयात शुल्क देखील माफ केले आहे.
केंद्र सरकार बड्या कॉटन लॉबीपुढं झुकून शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
जोपर्यंत कापसाच्या दरात वाढ होणार नाही तोपर्यंत सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशारा प्रकाश साबळे यांनी दिला आहे.
दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करण्याचा निर्णय घेतल आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवूण ठेवला आहे.