Share Market: भारतीय शेअर बाजाराची भरारी; जगातील पाचव्या क्रमांकाचा बाजार, फ्रान्सला मागे सारले
भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा जागतिक शेअर बाजारात आपले स्थान भक्कम केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय शेअर बाजार हा जगातील पाचव्या क्रमांकाचा बाजार ठरला आहे. फ्रान्सला मागे सारत भारताने स्थान मिळवले.
जानेवारी महिन्यात अदानी समूहाच्या शेअर दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे भारतीय शेअर बाजाराचे बाजार भांडवल घटले होते.
त्यानंतर आता अदानींचे शेअर सावरू लागल्याने भारतीय शेअर बाजाराचे बाजार भांडवल वाढले आहे.
मागील शुक्रवारी 26 मे रोजी शेअर बाजाराचे बाजार भांडवल 3.3 ट्रिलियन डॉलर इतके होते. त्यामागे अदानी समूहाचे वधारलेले शेअर्स आणि परदेशी गुंतवणूक महत्त्वाची ठरली.
मागील आठवड्यात फ्रान्स शेअर बाजाराच्या बाजार भांडवलात जवळपास 100 अब्ज डॉलरची घट झाली. लक्झरी उत्पादन कंपनी LVMH शी निगडीत शेअर दरात मोठी घसरण दिसून आली.
चीनमधील ढासळत्या आर्थिक बदलांचा भारताला फायदा होत आहे. या आधारे आशियातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतून विदेशी फंड भारतीय शेअर्समध्ये पैसे गुंतवताना दिसत आहेत.
परदेशी गुंतवणूकदारांनी एप्रिलच्या सुरुवातीपासून भारतीय शेअर बाजारात 5.7 अब्ज डॉलर गुंतवले आहेत.
भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या अदानी समूहाच्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात 15 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.