20 रूपयात करा मॅनिक्युअर आणि मिळवा सुंदर गुलाबी नखे
चेहऱ्यासोबतच नखांची सुंदरता ही महत्वाची आहे. गुलाबी सुंदर नखांसाठी आता पार्लर मध्ये जाण्याची काही गरज नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनेल स्पा केल्यास पर्सनॅलिटी उठून दिसू शकते.
जरी नखांसाठी अनेक प्रकारचे स्पा आणि उपचार आहेत, परंतु सुंदर आणि निरोगी नखांसाठी स्पा करणे खूप महत्वाचे आहे. पाहिले तर नेल स्पा करवून घेण्यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याचीही गरज नाही कारण तुम्ही घरच्या घरी नेल स्पा करून तुमचे नखे सुंदर आणि मजबूत बनवू शकता.
ग्लिसरीन तुमची नखे मजबूत करते आणि साय नखे मऊ आणि सुंदर बनवते तसेच त्यांचे पोषण करते. हे करण्यासाठी, एका भांड्यात थोड्या सायीमध्ये एक चमचा ग्लिसरीन घाला आणि व्हिटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल मिक्स करा.
ते चांगले मिसळा आणि हलक्या हातांनी नखांना मसाज करा. हे मिश्रण अर्धा तास नखांवर ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने हात धुवा.
काॅफीचा वापर करूनही तुम्ही घरबसल्या नेल स्पा करू शकता. त्यासाठी एका वाटीत काॅफी घ्या. त्यामध्ये नारळाचे तेल आणि एक चमचा मध मिक्स करा.
केवळ व्हिटामीन ईच्या गोळ्यांचा वापर करूनही नेल स्पा केला जाऊ शकतो.
एका भांड्यात दूध घ्या आणि त्यात थोडे गुलाब पाणी घाला. यासोबत आठवड्यातून दोनदा नखांना मसाज केल्यावर नखे गुलाबी होतात आणि खूप सुंदर दिसतात.
शॅम्पूच्या पाण्यात नखे बुडवून ठेवावीत. थोडा वेळानंतर कापसाच्या मदतीने ते साफ करून त्याला नारळाच्या तेलाने मसाज करावे.
व्हाईट व्हिनेगर आणि अंड्याचा ही वापर तुम्ही नेल स्पा करीता करू शकता.