Share Market : शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, 5 दिवसात 22 लाख कोटींची संपत्ती वाढली, गुंतवणूकदार मालामाल

भारतीय शेअर बाजारात सप्टेंबर 2024 नंतर पहिल्यांदा आठवड्याच्या पाच दिवसांमध्ये तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये 4 टक्क्यांची वाढ होऊन तो 77000 अंकांवर बंद झाला. यामुळं गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये तेजी दिसून आली. याशिवाय मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधील घसरण थांबली. यामुळं शेअर बाजारात आलेल्या तेजीनं 5 दिवसात गुंतवणूकदारांची संपत्ती 22 लाख कोटींनी वाढली.

विदेशी फंड्स कडून सुरु असलेली खरेदी आणि बँकांच्या शेअरमध्ये होणारी वाढ ही देखील सेन्सेक्स अन् निफ्टीमधील तेजीला कारणीभूत ठरली. अमेरिकेतली फेडरल रिझर्व्ह या संस्थेकडून व्याज दरात कपातीचे संकेत देण्यात आले याचा देखील परिणाम पाहायला मिळाला.
13 मार्चला शेअर बाजार बंद झाला तेव्हा बीएसईचं बाजारमूल्य 391.18 लाख कोटी रुपये होतं. तर, 21 मार्चला बीएसईचं बाजारमूल्य तेजीमुळं 413.30 लाख कोटी रुपये झालं आहे.
13 मार्चला शेअर बाजार बंद झाला तेव्हा बीएसईचं बाजारमूल्य 391.18 लाख कोटी रुपये होतं. तर, 21 मार्चला बीएसईचं बाजारमूल्य तेजीमुळं 413.30 लाख कोटी रुपये झालं आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)