Sovereign Gold Bond : 'सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड' योजनेची 'चौथी' सीरिज आजपासून सुरू...
स्वस्तात सोनं खरेदी करण्याची एक संधी तुमच्याकडे आहे. ही संधी म्हणजे, सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड. रिझर्व्ह बँकेच्या सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड योजनेची चौथी सीरिज आजपासून सुरू होत आहे. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया योजनेतंर्गत केंद्र सरकार बाजारभावापेक्षा कमी किमतीत शुद्ध सोनं विकतं. या योजनेंतर्गत सोनं खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, तुम्हाला स्वस्तात सोनं खरेदी करता येतंच, पण त्यासोबतच मोठा परतावाही मिळतो. (Photo Credit : unsplash)
सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड योजना 16 फेब्रुवारीपर्यंत खुली राहील म्हणजेच, तुमच्याकडे स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी फक्त 5 दिवसांसाठीच आहे. (Photo Credit : unsplash)
यापूर्वी, आर्थिक वर्ष 2023-24 साठी सॉव्हरिन गोल्ड बॉन्डचा तिसरा हप्ता गेल्या वर्षी 18 डिसेंबर रोजी जारी करण्यात आला होता, जो 22 डिसेंबरपर्यंत सुरू होती. (Photo Credit : unsplash)
या योजनेंतर्गत सरकारमार्फत विकलं जाणारं सोनं हे कागदी सोनं किंवा डिजिटल सोन्याचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये तुम्ही किती प्रमाणात सोनं कोणत्या दरानं खरेदी करत आहात याचं प्रमाणपत्र दिलं जातं. (Photo Credit : unsplash)
सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड योजनेच्या चौथ्या टप्प्याची इश्यू प्राईज 6,263 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. एवढंच नाही तर तुम्ही यामध्ये ऑनलाईन गुंतवणूक केल्यास प्रति ग्रॅम 50 रुपये अतिरिक्त सूटही दिली जाते. (Photo Credit : unsplash)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड योजनेतील गुंतवणुकीचा मॅच्युरिटी पीरियड 8 वर्ष आहे. जरी त्याचा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्ष असला तरी तुम्ही 5 वर्षांनंतर बाहेर पडण्याचा पर्याय निवडू शकता. (Photo Credit : unsplash)
सॉव्हरिन गोल्ड बॉन्डमध्ये तुम्ही 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करू शकता. (Photo Credit : unsplash)
सरकारनं नोव्हेंबर 2015 मध्ये ही योजना सुरू केली आणि आतापर्यंत गेल्या 8 वर्षांत ज्या गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना 12.9 टक्के इतका उत्कृष्ट परतावा मिळाला आहे. (Photo Credit : unsplash)
या योजनेअंतर्गत तुम्ही एका वर्षात किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोनं खरेदी करू शकता. तर ट्रस्ट आणि संस्था एका वर्षात 20 किलो सोने खरेदी करू शकतात. (Photo Credit : unsplash)
डिस्क्लेमर : कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या. (Photo Credit : unsplash)