Leg pain : रात्री झोपताना पाय दुखतात ? या पोषक तत्वांची आहे कमतरता !
शरीरात पोषक तत्वांची कमतरता, रेस्टलेस लेग सिंड्रोम, स्नायू संबंधित समस्यांमुळेही ही समस्या उद्भवू शकते. रात्री झोपताना पाय दुखणे ही काही आजाराची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा परिस्थितीत शरीरात कोणत्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे पाय दुखतात ते जाणून घेऊया... [Photo Credit : Pexel.com]
व्हिटॅमिन बीची कमतरता : शरीरात व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे रेस्टलेस लेग सिंड्रोमचा धोका वाढतो. व्हिटॅमिन बी ची कमतरता टाळण्यासाठी सफरचंद, संत्री, किवी, दही, चीज, केळी, मटार आणि नट्सचे सेवन करत रहा. [Photo Credit : Pexel.com]
मांसाहारी लोक त्यांच्या आहारात चिकन, सॅल्मन आणि ट्यूना फिश समाविष्ट करू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
व्हिटॅमिन डीची कमतरता :व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे रात्रीच्या वेळी पाय सुन्न होणे आणि पेटके येणे ही समस्या देखील होऊ शकते. शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे त्याचा थेट परिणाम हाडांवर होतो. [Photo Credit : Pexel.com]
जेव्हा हाडे कमकुवत होऊ लागतात तेव्हा मज्जातंतूशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. याशिवाय व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे डोपामाइनवर परिणाम होतो, ज्यामुळे रेस्टलेस लेग सिंड्रोमचा धोका सर्वाधिक असतो. [Photo Credit : Pexel.com]
व्हिटॅमिन डीची कमतरता टाळण्यासाठी सकाळी सूर्यप्रकाश घ्यावा. याशिवाय तुम्ही सॅल्मन, मॅकरेल आणि सार्डिन फिशचे सेवन करू शकता. [Photo Credit : Pexel.com]
कॅल्शियम आणि लोहाची कमतरता : शरीरात कॅल्शियम किंवा लोहाच्या कमतरतेमुळे रात्री झोपतानाही पाय दुखू शकतात. हे टाळण्यासाठी कॅल्शियम युक्त गोष्टी खाव्यात.[Photo Credit : Pexel.com]
तुम्ही दूध, चीज, दही आणि बदाम घेऊ शकता. त्याच वेळी, लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, तुम्ही पालक, ब्रोकोली, नट्स, राजमा आणि चणे खाऊ शकता. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]