RBI meeting: आरबीआयची आजपासून पतधोरण आढावा बैठक; व्याज दरवाढीचे संकेत
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची बैठक 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरबीआय गर्व्हनर 30 सप्टेंबर रोजी पतधोरण जाहीर करतील.
या बैठकीत रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा व्याज दरवाढ करण्याची शक्यता आहे.
महागाई नियंत्रित करण्यासाठी आरबीआयने मे महिन्यापासून आत्तापर्यंत रेपो दरात 1.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे रेपो रेट 4 टक्क्यांवरुन 5.40 टक्के इतका झाला आहे.
रेपो दरात वाढ झाल्यास व्याज दरात वाढ होणार. यामुळे विविध प्रकारची कर्जे महागतील. परिणामी ईएमआयमध्ये वाढ होणार.
रेपो दरवाढीमुळे कर्जे महाग झाली तरी, मुदत ठेवी (Fixed Deposite) वरील व्याज दरात वाढ होईल.
8 जून रोजी केलेल्या शेवटच्या पतधोरणेच्या घोषणेमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अर्धा टक्का वाढ केली होती.
महागाईचा दर अद्यापही सहा टक्क्यांहून अधिक असल्यामुळे व्याज दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
देशातील महागाईचा दर 6 टक्के व त्यापेक्षा खाली आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न सुरू आहेत.
अमेरिकेसह इतर देशांमध्येही महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्या देशांमधील मध्यवर्ती बँकांनी व्याज दरात वाढ केली आहे.