मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
राजधानी मुंबईत कधी आग, कधी लोकल दुर्गघटना, कधी मुसळधार पाऊस तर कधी पूल दुर्घटनाच्या दुर्घटना सातत्याने होतात. आता, घाटकोपरच्या नारायणनगर भागात मोठी आग लागल्याची घटना घडली आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआगी लागल्याची माहिती मिळताच, स्थानिकांनी अग्निशमन दलास पाचारण केले, मात्र, तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे स्थानिकांनीही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले आहेत.
घाटकोपर च्या नारायण नगर विभागातील एका प्लॅस्टिकचे रॅपर बनविणाऱ्या कारखान्याला ही भीषण आग लागली आहे. या कारखान्याच्या वरील बाजूस सम्राट नावाची शाळा आहे, सुदैवाने ही शाळा बंद होती.
कारखान्याच्या गोदामची आग मोठ्या प्रमाणात वाढत असून, आजूबाजूला रहिवासी वस्ती आहे, अग्मिशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाल्याचं दिसून आलं.
आगीच्या घटनेनंतर वस्तीतील नागरिकांनी तेथून दूर जाण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आगीतून उठणारे धुराचे लोट पाहून लोकं आगीच्या ठिकाणी गर्दीही करत आहेत.
कंपनीच्या गोदाममध्ये ज्वलनशील पदार्थ असल्याने आग भडकत असून आतमध्ये स्फोट होत असल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे.
नारायण नगर येथील आग लागलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वस्ती व लहानसहान कारखाने आहेत. त्यामुळे, पोलिसांनी परिसरात धाव घेत वाहतूक मार्ग बंद केले असून वर्दळ हटविण्यात येत आहे.