टाटा घराण्यातील 'ही' तीन नावे माहीत आहेत का? लाईमलाईटपासून दूर, पण सांभाळतायत कोट्यवधींचे उद्योग!
टाटा ग्रुप हा भारतातील सर्वांत मोठ्या उद्योग समूहांपेकी एक आहे. जेवणातल्या मिठापासून ते रस्त्यावर धावणाऱ्या मोठ्या ट्रकांपर्यंत टाटा समुहाची उत्पादने आहेत. रतन टाटा यांनी टाटा सन्स या मूळ कंपनीची धुरा तब्बल 22 वर्षे सांभाळली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र आता त्यांनी निवृत्ती घेतली असून त्यांच्या या साम्राज्याचा वारसदार कोण? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. मात्र कोट्यवधी रुपयांचा हा उद्योगसमूह सांभाळण्यासाठी टाटा घराण्यातील पुढची पिढी तयार होत आहे.
रतन टाटा यांनी लग्न केलेले नाही. त्यामुळे त्यांना अपत्य नाही. मात्र रतन टाटा यांचा सावत्र भाऊ नोएल टाटा यांनी मात्र लग्न केलेले असून त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची नावे लियाह टाटा, माया टाटा, नेविले टाटा अशी त्यांची नावे आहेत.
या तिन्ही मुलांकडे सध्या टाटा समुहाच्या वेगवेगळ्या उद्योगधंद्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. टाटा घराण्यातील हीच पिढी टाटा सन्सचा कारभार पाहण्यासाठी सज्ज होत आहे.
तसं पाहायचं झालं तर टाटा घराण्यातील ही पुढची पिढी लाईमलाईटपासून दूर आहे. मात्र ते टाटा समुहाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी काम करत आहेत. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा हे टाटा समुहाच्या 'ट्रेंड' या फॅशन बिझनेस ब्रँडला सांभाळतात. त्यांची 38 वर्षीय लिहाय नावाची मुलगी हॉटेल इंडस्ट्री सांभाळते.
2007 साली लियाह टाटा यांनी टाटा समुहात काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी मुंबईच्या जयहिंद कॉलेजमधून शिक्षण घेतलेले आहे. पुढे मार्केटिंगमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी संपादन केलेली आहे. ताज हॉटेलसह त्या टाटा मेडकिल सेंटर ट्रस्टच्या ट्रस्टी आणि कोलकाता टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या इंन्चार्ज आहेत.
नोएल टाटा यांची दुसरी मुलगी माया टाटा यांनी ब्रिटनच्या बिझनेस स्कुलमधून शिक्षण घेतलेलं आहे. टाटा समुहातील टाटा अपॉर्च्युनिटिज फंडची त्यांच्याकडे जबाबदारी होती. मात्र टाटा अपॉर्च्युनिटिज फंड बंद झाल्यानंतर त्या टाटा डिजिटल सांभाळत आहेत. डिजिटल क्षेत्रात आपण काय काय करू शकतो, यावर सध्या त्या काम करत आहेत.
नेविले टाटा हे टाटा समुहाच्या रिटेल उद्योगांकडे विशेष रुपाने लक्ष देतात. ते ट्रेंट हायपरमार्केट प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख आहेत. वेस्टसाईड, स्टार मार्केट अशी रिटेल ब्रँड्स या कंपनीच्या अंतर्गत येतात. नेविले टाटा यांची पत्नी मानसी किर्लोस्कर या किर्लोस्कर कंपनीच्या संचालक आहेत.