Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vehicle Sales : वाहन विक्रीला अच्छे दिन, तब्बल 19 टक्क्यांनी वाढ!
या वर्षीचा 42 दिवसांचा सणासुदीचा हंगाम वाहन विक्रेत्यांसाठी चांगलाच फायद्याचा ठरला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या वर्षीच्या याच कालावधीतील मोटार वाहनांच्या एकून विक्रीच्या तुलनेत या वर्षी 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यंदाची वाहन विक्रीची संख्या 31लाख 95 हजार 213 वाहनांवरुन 37 लाख 93, 584 वाहनांवर गेली असल्याची माहिती वाहन उद्योगाचे नेतृत्व करणाऱ्या फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा) या संघटनेने दिली आहे.
फाडाच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात एकूण वाहन विक्रीत एका महिन्याच्या आधारावर 35 टक्क्यांनी आणि वार्षिक आधारावर 18 टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यात एकूण 28 लाख 54 हजार 242 वाहनांची विक्री झाली. यामध्ये प्रवासी वाहने, तीनचाकी, दुचाकी वाहनांचा समावेश आहे.
दुचाकींची नोंदणी एका वर्षाच्या आधारावर 21 टक्क्यांनी वाढून यावर्षी 28 लाख 93 हजार 107 वाहनांवर गेली आहे.
मागील वर्षी याच कालावधीमध्ये 23 लाख 96 हजार 665 वाहनांची विक्री झाली होती, असे फाडाचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी सांगितलें
विशेष करून ग्रामीण भागातही दुचाकींच्या खरेदीत वाढ झाली. या कालावधीत व्यावसायिक वाहनांची विक्री वार्षिक आधारावर आठ टक्क्यांनी वाढून 1 लाख 23 हजार 784 वाहनांवर गेली.
नवरात्रीपासून सूरू होऊन धनत्रयोदशीनंतर 15 दिवसांनी संपणाऱ्या सणासुदीच्या हंगामात प्रवासी वाहनांची जी विक्री झाली ती 10 टक्क्यांनी वाढून 5लाख 47 हजार 246 वाहनांवर गेली. मागील वर्षी याच कालावधीत 4 लाख 86 हजार 47 वाहनांची विक्री झाली होती. मात्र या वर्षी देशातील जोरदार मागणीमुळे वाहनांच्या विक्रीचा हा विक्रम झाला आहे.