FD Rates: FD वर या पाच बँका देतात 9 टक्क्यापेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या FD वरील व्याजदर
रिझर्व्ह बँकेची एक चलनविषयक धोरण ठरवणारी समिती आहे. या समितीने गेल्या 2 बैठकीमध्ये रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. किरकोळ महागाईत घट झाल्यामुळे रेपो दर स्थिर ठेवण्यासाठी मोठी मदत झाली आहे. यामुळे समितीने रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरंतु त्याच्याही आधी जवळपास एक वर्षाच्या दरम्यान रिझर्व बँकेने रेपो दरात वेगानं वाढ केली आहे. फक्त दीड वर्षाच्या दरम्यान रिझर्व बँकेच्या रेपो दरात 2.50 टक्के इतकी वाढ झाली आहे.
या रेपो दरात वाढ झाल्यानं काही लोकांना तोटा, तर काही लोकांना फायदा झाला आहे. यामुळे कर्ज घेणं परवडत नाही, आणि ईएमआयच्या हफ्त्याचं ओझं वाढलं. मात्र, दुसरीकडे सेव्हिंग अकाऊंटपासून ते फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ झाली आहे.
साधारण गेल्या एक ते दीड वर्षापासून रेपो दरात सातत्यानं वाढ करण्यात आली. यामुळे काही बँक पुन्हा एकदा एफडीवर 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देऊ लागल्या. परंतु हे उच्च व्याजदर सर्व ग्राहकांना लागू होणार नाही. याचा फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच लाभ मिळणार आहे. या बँकाविषयी सविस्तर जाणून घेऊया...
Unity Small Finance Bank: यूनिटी स्मॉल फायनान्स बँक 181 ते 201 दिवसाच्या मॅच्युरिटीवर 9.25 टक्के व्याज देता आहेत. तर 1001 दिवसांच्या मुदतीसह एफडीवर 9.50 टक्के व्याज दर देण्यात येत आहे.
Fincare Small Finance Bank : फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक 1000 दिवसाच्या मॅच्युरिटीसह एफडीवर 9.11 टक्के इतका व्याज देत आहे. या व्याज दराचा बँकेचे ग्राहक असणाऱ्या फक्त जेष्ठ नागरिकांनाचा लाभ मिळू शकतो.
Jana Small Finance Bank: जन स्मॉल फायनान्स बँककडूनही जेष्ठ नागरिकांना 9 टक्के इतका व्याज दिला जात आहे. हा व्याजदर अनुक्रमे 366 दिवसापासून ते 499 दिवस, 501 दिवसापासून ते 730 दिवस आणि 500 दिवसाची मॅच्युरिटी असणाऱ्या एफडीवर मिळत आहे.
Suryoday Small Finance Bank: सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांच्या मुदत ठेवींवर 9.6 टक्के इतका व्याज दिला जात आहे. तर 999 दिवसांच्या मॅच्युरिटीवर 9 टक्के व्याज मिळत आहे.
ESAF Small Finance Bank: ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक जेष्ठ नागरिकांना 2 ते 3 वर्षाच्या मुदत ठेवींवर 9 टक्के इतका व्याज देत आहे.