Pension Plan : रिटायरमेंटची प्लॅनिंग करताय? 'या' चार सरकारी पेन्शन योजनांमध्ये करा गुंतवणूक, वाचा सविस्तर...
तुम्ही रिटायरमेंटमध्ये मासिक उत्पन्न शोधत असाल, ज्यामध्ये तुम्हाला दरमहा पैसे मिळत राहतील, तर आम्ही तुमच्यासाठी काही पेन्शन योजनांची (Pension Schemes) माहिती देणार आहोत. (PC:istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळू शकते. यासोबतच तुम्ही कर आणि इतर काही गोष्टींचाही लाभ घेऊ शकता. (PC:istock)
Senior Citizens Savings Scheme : ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) - जर तुमचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. 55 ते 60 वयोगटातील नागरिकही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. (PC:istock)
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत 30 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. यामध्ये आयकर कलम 80C अंतर्गत कर लाभ दिला जातो. ही योजना लघु बचत योजनेअंतर्गत चालवली जाते.(PC:istock)
National Pension System : राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) - या योजनेत तुम्ही नियमित गुंतवणूक करु शकता. सेवानिवृत्तीनंतर, कर्मचाऱ्यांना या योजनेतून काही पैसे काढता येतात आणि इतर शिल्लक पैसे कॉर्पस खरेदीमध्ये गुंतवू शकतात. त्यानंतर तुम्हाला मासिक पेन्शन दिली जाईल. ही मार्केट लिंक्ड योजना आहे. (PC:istock)
राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये (NPS) 8 ते 10 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळतो. पाच वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर तुम्ही या योजनेतून पैसेही काढू शकता.(PC:istock)
Pradhan Mantri Vaya Vandana Yojana : प्रधानमंत्री वय वंदना योजना - या योजनेअंतर्गत पेन्शनसोबतच तुम्हाला विम्याचाही लाभ मिळतो. ज्येष्ठ नागरिक LIC अंतर्गत या योजनेत गुंतवणूक करु शकतात (PC:istock)
प्रधानमंत्री वय वंदना योजनेमध्ये 15 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. यामध्ये 10 वर्षांसाठी 7.4 टक्के वार्षिक व्याज दिले जाते. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.(PC:istock)
Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजना ही करदात्यांसाठी नाही. यासाठी 25 ते 40 वयोगटातील नागरिक गुंतवणूक करु शकतात. यामध्ये, तुमच्या जमा रकमेवर पाच वर्षांसाठी सरकारकडून योगदान दिलं जातं. (PC:istock)
वयाच्या 60 वर्षांनंतर तुम्ही अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत मासिक 1 हजार, 2 हजार, 3 हजार आणि 5000 रुपये पेन्शन घेता येते.(PC:istock)