NPS : दर महिन्याला 50,000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल? समीकरण जाणून घ्या
वयाच्या 18 व्या वर्षापासून ही योजना सुरू करता येते. यामुळे तुमचे पैसे वाढण्यास अधिक वेळ मिळतो आणि तुम्हाला सेवानिवृत्तीसाठी मोठा निधी जमा करता येतो. (Image Source : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्र सरकारने 1 जानेवारी 2004 रोजी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) सुरू केली. सुरुवातीला फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेली ही योजना नंतर सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली. (Image Source : istock)
एनपीएस ही दीर्घकालीन योजना आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे ही योजना चालवले जाते. (Image Source : istock)
18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकते. वयाच्या 60 वर्षानंतर, NPS मध्ये जमा झालेल्या रकमेपैकी 60 टक्के रक्कम एकरकमी काढता येते. (Image Source : istock)
उर्वरित 40 टक्के रक्कम अॅन्युइटीमध्ये गुंतवावी लागते. हा पैसा पेन्शन देण्यासाठी वापरला जातो. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) योजना 9 ते 12 टक्के परतावा देते. (Image Source : istock)
NPS मध्ये, आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट आणि कलम 80CCD1(B) अंतर्गत 50,000 रुपयांची सूट दिली जाते. (Image Source : istock)
महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मिळणारी रक्कम करमुक्त आहे. सेवानिवृत्तीनंतर दरमहा 50,000 रुपये पेन्शन कशी मिळवायची? ते जाणून घ्या. (Image Source : istock)
एनपीएस कॅल्क्युलेटरनुसार, जर 25 वर्षांच्या व्यक्तीने 60 वर्षांपर्यंत एनपीएसमध्ये दरमहा 6,531 रुपये गुंतवले तर, त्याला 60 वर्षांनंतर दरमहा 50,005 रुपये पेन्शन मिळेल. (Image Source : istock)
या कालावधीत संबंधित व्यक्ती 27,43,020 रुपयांची गुंतवणूक करेल, ज्यामुळे 2,50,02,476 रुपयांचा निधी जमा होईल. यामध्ये त्याला 2,22,59,456 रुपये नफा मिळेल. (Image Source : istock)