बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल! माऊलींच्या गाभाऱ्यात मोसंबीचा बहर
आज दिवाळी पाडवा... यानिमित्तानं पंढरीत माऊलींच्या राऊळीला आकर्षक सजावट केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळी पाडव्यानिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या विठ्ठल भक्तानं सात हजार मोसंबी वापरून मंदिरात आकर्षक सजावट केली आहे.
आज दिवाळी पाडव्यानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या वाघाली येथील आप्पासाहेब रामकृष्ण पाटील या विठ्ठल भक्तानं सजावट केली आहे.
सात हजार मोसंबी वापरून विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट केली आहे.
विठ्ठल मंदिरात फुलं आणि फळांचा वापर होऊन कलात्मक पद्धतीनं विविध प्रकारची सजावट नेहमी केली जाते.
यंदा आज पहिल्यांदाच विठ्ठल मंदिरात मोसंबीचा वापर करण्यात आला आहे.
या सजावटीमुळे विठ्ठल मंदिराला मोसंबी बागेचं रुप आलं आहे.
दिवाळीनिमित्त लाडक्या विठ्ठलाची भेट घेण्यासाठी वारकऱ्यांनी पंढरीत गर्दी केली आहे.
विठुरायाचंय गोजिरं रूप आपल्या डोळ्यांत साठवत आहे.