Gold Investment Tips : 'या' पद्धतीने खरेदी करू शकता सोनं, शुद्धतेची चिंताच नाही!

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या निमित्ताने लोकांना दागिने खरेदी करायला आवडतात. अशा परिस्थितीत आजही भौतिक सोने खरेदी (दागिने, सोन्याची बिस्किटं) ही लोकांची पहिली पसंती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पण प्रत्यक्षात सोनं (दागिने अथवा बिस्किटे) खरेदी करताना शुद्धता आणि चोरीची भीती असते. अशा स्थितीत तुम्ही सोन्यात गुंतवणुकीसाठी इतर प्रकारच्या पर्यायांचा विचार करू शकता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी सार्वभौम गोल्ड बाँड (SGB) योजना आणत असते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला गुंतवलेल्या रकमेवर व्याजाचा लाभ मिळू शकतो.
आरबीआय दर काही महिन्यांच्या अंतराने ही योजना सुरू करत असते.
तुम्ही गोल्ड ईटीएफ (Gold ETF) म्हणजेच गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडाद्वारे सोन्यात गुंतवणूक करू शकता.
हे असे शेअर्स आहेत ज्यांची किंमत सोन्यावर ठरलेली असते.
गोल्ड फंड हा म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवू शकता.
गोल्ड फंड्सद्वारे, तुम्ही सोन्याच्या साठ्यात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवू शकता. अशा परिस्थितीत सोन्याच्या वाढत्या किमतीचा फायदा तुम्ही अप्रत्यक्षपणे घेऊ शकता.
जर तुम्हाला 24 कॅरेट सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर डिजिटल सोने हा उत्तम पर्याय आहे.
पेटीएम, फोनपे इत्यादी अनेक UPI अॅप्सद्वारे तुम्ही डिजिटल सोन्यात गुंतवणूक करू शकता.
अनेक मोठ्या ज्वेलरी कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी सोने बचत योजना आणत असतात.
या योजनेंतर्गत तुम्ही दर महिन्याला थोडी रक्कम गुंतवून स्वस्त दरात सोने खरेदी करू शकता.